लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येते नविन वर्ष २०१९ मध्ये नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत असलेल्या थकीत कर धारक नगरपरिषदेच्या रडारवर असून, त्यांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद कर विभागाच्यावतिने देण्यात आली.नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा शासकीय कार्यालयांकडे जवळपास ३ कोटी रुपयांसह नागरिकांकडे कोटयवधी रुपयांचा कर थकीत आहे. २९ डिसेंबरपर्यंत शासकीय कर वगळता नगरपरिषदेच्या कर विभागाने ४.५० कोटी रुपये कराची वसुली केली आहे.वाशिम नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत अनेकांकडे कराचा भरणा बाकी असल्याने जे वेळेच्या आत थकबाकीदार थकबाकी भरणार नाहीत अशा थकीतधारकांना नविन वर्षात जानेवारी महिन्यात जप्तीच्या नोटीसा देण्यात येणार असल्याची माहिती कर विभागाच्यावतिने देण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के वसुली करण्याचा मानस मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी व्यक्त केला असून त्यासाठी करनिरिक्षक अ.अजीज अ. सत्तार, करसंग्राहक प्रयत्नशिल असून आपल्या भागातील करसंग्राहकांशी संपर्क साधून आपला कर भरुन होणाºया कारवाईस टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी केले आहे.थकीत कर असलेल्यांनी आपल्या भागातील करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, के.आर. हडपकर, नाजिमोद्दिन मुल्लाजी, मुन्ना खान, दत्ता देशपांडे, रमजान बेनिवाले, संजय काष्टे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करनिरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी केले आहे.
ज्या नागरिकांकडे नगरपरिषदेचा कर थकीत आहे त्यांनी वेळेच्या आत कराचा भरणा करुन नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येत असलेल्या कारवाईस टाळावे. शहर विकासासाठी कराचा भरणा करणे अत्यावश्यक असल्याने नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे.- वसंत इंगोलेमुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद