लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी याकरिता अनेक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली, परंतु याचा काहीच फायदा होत नसून वाशिम शहर वाहतूक शाखा नावापुरतीच दिसून येत आहे. फेरीवाले, लघुव्यावसायिक चक्क रस्त्यावर दुकान थाटून बिनधास्तपणे बसत असतांना सुध्दा कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी त्यांना हटकतांना दिसून येत नसल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे. याकडे पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहरवासियांची वाढती मागणी व संबधितांवर निर्माण झालेला दबावामुळे पार्कींग व्यवस्था करण्यात आली. वाहनधारकांना होत असलेल्या दंडामुळे वाहने लाईनदोरीत आलीत परंतु फेरीवाले रस्त्यावर आल्याने वाहने चालवितांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहरात वाहतूक शाखा कार्यरत असतांना रस्त्यावर अडथळा निर्माण करणाºया वाहनांवर कारवाई करण्याची त्यांची जबाबदारी असतांना सुध्दा त्याकडे कुणीही फिरकून पाहतांना दिसून येत नाही. जेथे वाहतूक सुरळीत सुरु आहे तेथे मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठया प्रमाणात दिसून येतात. रस्त्यावरुन जाणाºया वाहनांना अडवून त्यांना कागदपत्राची मागणी केल्या जाते. कागदपत्रे नसल्यास त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो. यापैकी किती दंड येतो व किता दाखविला जातो हा जरी चिंतनाचा विषय असला तरी रहदारीच्या ठिकाणी नागरिकांना होणाºया त्राासाचे या शाखेला काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारीही काहीच बोलत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. पोलीस अधिक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष देवून शहरातील रस्त्यावर उभे राहणाºया लघुव्यावसायिकांचा बंदोबस्त करुन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
वाशिम शहर वाहतूक शाखा नावापुरती; चक्क रस्त्यावर उभी राहतात वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:16 PM