लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्या आत्मा व जिल्हा कृषी विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात पाणी फाऊंडेशन पाणलोट व्यवथापनचे ’मॉडेल स्टॉल’ लावण्यात आले आहेत. या स्टॉलला नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भेट देऊन पाणलोटशास्त्राची विस्तृत माहिती घेतली.कृषी विभागाच्यावतीने वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषीविषयक योजनांची प्रसिद्धी करणारे, तसेच शेतकºयांच्या उत्पादनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात पाणी फाऊंडेशनच्या पाणलोट कार्यक्रमाची माहिती देणाºया मॉडेल्सचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. या स्टॉलला जिल्हाधिकारी ऋ षीकेष मोडक, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, उपअधीक्षक चौधरी, तहसीलदार अरखराव यांनी रविवारी सांयकाळी भेट देऊन पाणलोटबाबत सविस्तर जाणून घेतले. पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक प्रशिक्षक मयुरी काकड, तांत्रिक सहायक निलेश भोयरे यांनी हे मॉडल तयार केले आहेत. दरम्यान, पाणी फाऊंडेशनच्या पाणलोट मॉडेलची माहिती घेण्यासाठी महिलावर्गांत उत्सुकता दिसत आहे. या ठिकाणी महिला दुष्काळग्रस्त गाव, समृद्ध गाव यातील फरक जाणून घेत जलसंधारणाचे धडेही घेत आहेत. २५ फेब्रुवारीपर्यंत या स्टॉलला ४२३ लोकांनी भेट देऊन पाणलोट कार्यक्रमाची माहिती घेतली. या कार्यक्रमासाठी पाणी फाऊंडेशनचे विदर्भ प्रोडक्शन प्रमुख प्रफुल कोल्हे, तालुका समन्वयक समाधान वानखडे, जलमित्र गोपाल भिसडे परिश्रम घेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणलोटशास्त्राची उजळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 3:19 PM