लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : पंचायत राज समितीच्या चमुने १८ जानेवारीला मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदूरजना मोरे रस्त्याची पाहणी केली असता संबंधित अधिका-यांना या रस्त्याची पुन्हा निविदा काढून रस्ता योग्य असा करुन द्यावा तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी शेंदुरजना ग्रामवासीयांनी रस्त्याबाबतच्या तोंडी तक्रारी केल्या. पंचायत राज समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर, आमदार राहूल बोंद्रे, आमदार चरण वाघमारे, यांच्यासह अन्य सदस्य व संबंधित अधिकाºयांनी सर्वप्रथम शेलूबाजार ग्रामपंचायतच्या कार्यालयाला विनंतीवरून भेट दिली असता ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्याकडून विविध योजनाच्या खर्चाबाबत माहिती घेतली. त्यानंतर सदर चमूने शेंदूरजना ग्राम पंचायत सरपंच अविनाश अशोक धामंदे यांनी सदर रस्ता कामाची चौकशी व्हावी यासाठी जि.प.समोर उपोषण सुरु केले होते. त्या तक्रारीची दखल घेत रस्ता डांबरीकरण केल्यावर अवघ्या १५ दिवसात खड्डामय झालेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी सदर कामाच्या पुन्हा निविदा काढा, अंतिम देयक कंत्राटदाराला न देता काम पूर्ण करून संबंधित कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवा अशा सुचना मंगरुळपीर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिनेश मालपानी यांना दिल्या. पीआरसीच्या चमूने दिलेल्या आदेशाचे पालन संबंधित अधिकारी करतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
वाशिम : शेलुबाजार-शेंदुरजना रस्ता पुन्हा निविदा काढून पूर्ण करा - पंचायत राज समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 5:43 PM
शेलूबाजार (वाशिम) : पंचायत राज समितीच्या चमुने १८ जानेवारीला मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदूरजना मोरे रस्त्याची पाहणी केली असता संबंधित अधिकाºयांना या रस्त्याची पुन्हा निविदा काढून रस्ता योग्य असा करुन द्यावा तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी श्ोंदूरजना ग्रामवासीयांनी रस्त्याबाबतच्या तोंडी तक्रारी केल्या.
ठळक मुद्देसंबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे संकेत