वाशिम : पेट्रोल, डिझेल दर वाढीच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:44 PM2018-04-11T17:44:08+5:302018-04-11T17:44:08+5:30
वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात ११ एप्रिल रोजी पाटणी चौक येथे शहर काँग्रेस कमिटीच्यावतिने निदर्शने देण्यात आली. यावेळी दरवाढ कमी झालीच पाहिजे याशिवाय विविघ घोषणा देण्यात आल्यात.
वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात ११ एप्रिल रोजी पाटणी चौक येथे शहर काँग्रेस कमिटीच्यावतिने निदर्शने देण्यात आली. यावेळी दरवाढ कमी झालीच पाहिजे याशिवाय विविघ घोषणा देण्यात आल्यात.
केंद्रातील व राज्यातील भाजपा प्रणित सरकारने प्रचंड प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढविल्यासंदर्भात यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. निदर्शनानंतर दरवाढ कमी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले की, मागील तीन वर्षांपासून केंद्रातील व राज्यातील भाजपा प्रणित सरकारने आंतरराष्टÑीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमंती कमी होवून देखिल पेट्रोल, डिझेल व गॅस दराच्या किंमती वारंवार वाढत राहिल्यामुळे महागाई वाढत गेली. सामान्य जनता या सरकारला अतिशय त्रस्त झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या यु.पी.ए. सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत आंतरराष्टÑीय बाजारपेठेत भाववाढ झालेली असतांना सुध्दा सामान्य जनतेचा, गोरगरिबांचा विचार करुन भाव नियंत्रणात ठेवण्यात सरकार यशस्वी झाले. काँग्रेस पक्षाने नियमित सामान्य जनतेचा विचार केला आहे. परंतु भाजपाप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बºयाच कंपन्यांच्या मोठया प्रमाणात फायदा करुन दिला आहे. त्यामुळे देशातील सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महागाई सारखी वाढत आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव वानखेडे व ईतर पदाधिकारी, एन.एस.यु. आय., महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग या सर्वांचे पदाधिकारी व विविध सेलच्या पदाधिकारी यांचेवतिने पेट्रोल डिझेल व गॅस दर वाढीचा निषेध व्यक्त करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
निवेदनावर वाय.के. इंगोले, पी.पी. अंभोरे, डॉ. विशाल सोमटकर, पिंटु भालेराव, प्रमोद भवाळकर, गजानन कदम, शैलेश सारसकर, आरीफ भाई, अखिलभाई, शेख याकुब, संतोष दिवटे, गजानन वानखेडे, पांडुरंग हरकळ, साईराम पाटील, महादेव काळबांडे, बाळुभाऊ कानगुडे, शैलेश ठोंबरे, रामन इंगोले, बोडखे, गजानन कव्हर, विकास राऊत, सुभाष कांबळे, सुनिल मापारी, विजय बन्सोड, मोहन इंगोले, सचिन इंगळे, शेख ख्वाजा, रामभाऊ श्रीमंत, फरीदबाबा, गणेश गायकवाड, रोजशेख गफ्फार, पाखरे, अ. रफीक, दानिष, जाधव , लोणसुने, समाधान माने, राजु घोडीवाले, सोनोने यांच्या स्वाक्षºया आहेत.