लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.जिल्हय़ात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ८५0९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. रविवारनंतर सोमवारी कारंजा तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर १३ फेब्रुवारीला कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. मानोरा तालुक्यातील रूईगोस्ता परिसरात झालेल्या गारपिटीने फळबागा व गहू, हरभरा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील गोवर्धन, पार्डी तिखे, आसेगाव, येवती, रिठद, चिंचाबापेन, दापुरा, किनखेडा, पळसखेडा, वाडी रायताळ, मसलापेन आदी परिसराला गारपिटीने झोडपून काढल्याने शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्या चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून, येत्या आठवड्यात अंतिम अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे.मालेगाव तालुक्यातील मुंगळा, शिरपूर, राजुरा परिसरातील गहू, हरभरा यासह संत्रा व फळबागेचे अतोनात नुकसान झाले असून, पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, याचा प्राथमिक अंदाज येत्या दोन दिवसात सांगता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वाशिम तालुक्यातील अनसिंग, वारा जहागीर, देपूळ, उमरा शमशोद्दीन, बोरी, धानोरा मापारी, दगडउमरा यासह अन्य ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने १६00 ते १८00 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातही पंचनामे केले जात आहे. रविवारी झालेल्या गारपिटीपेक्षा मंगळवारच्या गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत प्राथमिक अंदाज समोर येईल तसेच येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
वाशिम : हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:54 AM
वाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.
ठळक मुद्देयुद्धपातळीवर पंचनामे येत्या आठवड्यात अहवाल तयार होण्याचा अंदाज