लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम आगार परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने ‘स्वच्छ भारत मिशन’चा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. सर्वत्र अस्वच्छता पसरली असून, ‘वराहा’चा मुक्त संचार असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या वाशिम बसस्थानकामध्ये दोन नवीन फलाटाचे काम दोन वर्षापूर्वी करण्यात आले. फलाटाचे किरकोळ काम बाकी असून, सर्वत्र वराहाचा मुक्त संचार असतो. या वराहामुळे प्रवाशी त्रस्त झाल्याचे दिसून येते. वराहाचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांनी यापूर्वी अनेकवेळा केली आहे. मात्र, अद्याप वराहाचा बंदोबस्त झाला नाही. बसस्थानक परिसरात घाण पाणी व कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळही अस्वच्छता असल्याचे दिसून येते. नियमित साफसफाई होत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात आगार प्रमुख इलमे म्हणाले की बसस्थानकाची नियमित साफसफाई केली जाते तसेच वराहाचा बंदोबस्त केला जाईल.
वाशिम आगाराला ‘स्वच्छ भारत मिशन’चा विसर; सर्वत्र अस्वच्छता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 4:10 PM