लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दालन खुले करून दिले. मात्र, आजमितीस ही शाळा बंद असून ही खेदाची बाब आहे. सदर शाळा सुरू करून भिडेवाड्यासा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी गोभणी (ता. रिसोड) येथील महिलांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्त्री शक्ती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या महिलांनी यासंदर्भात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुण्याच्या बुधवारपेठ येथील भिडेवाडा येथे १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करून फुले दाम्पत्याने देशातील समस्त महिलांना शिक्षणाची संधी दिली. तीच शाळा सद्या बंद असून शाळेचा जिर्णोद्धार करून तमाम महिलांसाठी प्रेरणास्थान ठरावी, अशा भिडेवाड्याचा विकास करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी महिलांनी केली.
वाशिम : पुणे येथील भिडेवाड्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करा; महिला धडकल्या जिल्हा कचेरीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 7:48 PM
वाशिम : महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दालन खुले करून दिले. मात्र, आजमितीस ही शाळा बंद असून ही खेदाची बाब आहे. सदर शाळा सुरू करून भिडेवाड्यासा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी गोभणी (ता. रिसोड) येथील महिलांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली.
ठळक मुद्देबंद असलेली मुलींची पहिली शाळा सुरू करण्याची मागणीजिल्हाधिका-यांना दिले निवेदन