शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवे संकेतस्थळ कार्यान्वित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 2:37 PM

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयाचे वाशिम डॉट जीओव्ही डॉट ईन हे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देकेंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सुचनेनुसार देशातील सर्व जिल्ह्यांचे संकेतस्थळ ‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात ‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर संकेतस्थळ सुरु करणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे.छायाचित्रे व व्हिडीओ आदी माहिती मराठी, इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली असून ही माहिती सातत्याने अद्ययावत केली जाणार आहे.

 वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयाचे वाशिम डॉट जीओव्ही डॉट ईन हे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रियांका मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार आदी उपस्थित होते. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सुचनेनुसार देशातील सर्व जिल्ह्यांचे संकेतस्थळ ‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात ‘स्वास’ प्लॅटफॉर्मवर संकेतस्थळ सुरु करणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे. अधिक सुरक्षित, सुटसुटीत व सहज हाताळता येणाऱ्या या संकेतस्थळावर वाशिम जिल्ह्याविषयी सर्व माहिती, नवीन घडामोडी, पर्यटनस्थळे,विविध उपक्रम, या उपक्रमांशी निवडीत छायाचित्रे व व्हिडीओ आदी माहिती मराठी, इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली असून ही माहिती सातत्याने अद्ययावत केली जाणार आहे.जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, त्यांचे सहकारी मोहम्मद सिद्दिक अहेमद, प्रदीप ठाकरे यांनी हे संकेतस्थळ तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांना महाराष्ट्र ‘स्वास’टीमचे आमोद सूर्यवंशी, श्रीमती इरेणी, राजेश सावळे यांचे सहकार्य लाभले. तसेच दिल्ली येथील ‘स्वास’ टीमने या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय