- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत २४ दिवसावर आली आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यात पीकविम्याची जबाबदारी स्विकारण्यास एकही कंपनी तयार नाही. आता शेतकरी ही योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन निवेदन सादर करीत आहेत.राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असून, राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये राबविण्यास शासनाने २८ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये मंजुरीही दिली आहे. तथापि, राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यात अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविणे आवश्यक असल्याने यासाठी विमा कंपन्यांडून निविदा मागविण्यात आल्या त्यात अहमदनगर, नांदेड, बुलडाणा, सातारा, यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे, परभणी, अकोला, सांगली, नागपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी भारती एक्सा जनरल इन्शूरन्स कंपनी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार ,रायगड या सहा जिल्ह्यांसाठी बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, तर उस्मानाबाद, नाशिक, कोल्हापूर, गोंदिया आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनीने निविदा भरून जबाबदारी घेतली आहे. तथापि, राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी वाशिमसह बीड, लातूर, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी (सिंधदुर्ग) मुंबई, भंडारा, चंद्र्रपूर, गडचिरोली, सोलापूर या १४ जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही. अर्थात या १४ जिल्ह्यातील पीक विम्याची जोखीम पत्करण्यास कोणतीही कंपनी तयार झालेली नाही.परिणामी, या १४ जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पीकविम्याच्या संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात निवेदन सादर करून रब्बी पीकविमा योजना राबविण्याची मागणी करीत आहेत.भारतीय कृषी पीकविमा कंपनीचाही निर्णय नाहीकोणत्याही खासगी कंपनीने राज्यातील वाशिमसह १४ जिल्ह्यांत रब्बी पीकविम्याची जोखीम पत्करण्याची तयारी दर्शविली नसताना आता शासनाच्या कृषीविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविणे आवश्यक आहे. तथापि, पीक विमा भरण्यास सुरुवात झाली असताना आणि ही मुदत ३१ डिसेंबर असल्याने आता शेतकºयांकडे २४ दिवस उरले असतानाही या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष या संदर्भातील निर्णय घेतल्यानंतर शेतकºयांना पीक विमा भरण्यास किती वेळ मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
वाशिमसह इतर काही जिल्ह्यात कोणत्याही कंपनीने रब्बी पीकविम्याच्या जबाबदारीसाठी निविदा भरलेल्या नाहीत. या संदर्भात शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षीत आहे. शासनाच्या कृषीविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता असून, शेतकºयांना रब्बी पीकविमा भरण्यास मुदतवाढही दिली जाऊ शकते. तथापि, याबाबत शासन निर्णयानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता निश्चित काही सांगता येणार नाही.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम
केंद्र व राज्य सरकार पीक विमा योजनेसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करते. तर वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी मात्र अद्यापही वाशिम जिल्ह्यात शेतकºयांना पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही. यासंदर्भात कृषी अधिकाºयांशी संपर्क साधला असता, या योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात कोणतीच कंपनी तयार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकाºयांना यासंदर्भात निवेदन सादर करून शेतकºयांची समस्या मांडली आहे.- लक्ष्मण जोगदंडशेतकरी, मसोला ता. मालेगाव