वाशिम: महावितरणकडून घेतल्या जाणाºया ‘रिडिंग’नुसार आकारले जाणारे विद्यूत देयक महिण्याच्या १० तारखेपर्यंत सर्व ग्राहकांच्या हाती पडते. मात्र, चालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही. जुन्या एजन्सी बदलून नव्या एजन्सीकडे हे काम दिल्यामुळेच ही समस्या उद्भवल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.
जिल्ह्यात महावितरणचे १ लाख ५२ हजार ८८६ घरगुती वीज वापर करणारे ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांचे ‘मीटर रिडींग’ घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या २ किंवा ३ तारखेपर्यंत देयके तयार होतात. ती १० तारखेपर्यंत वाटप झाल्यास ग्राहकांना मुदतीच्या आत देयक अदा करणे सोपे होते. यामुळे विलंब आकारही लागत नाही. चालू महिण्यात मात्र महावितरणकडूनच देयके वाटप करण्यास उशिर झाला असून संपूर्ण ग्राहकांना देयक वाटप करण्यास आणखी ४ ते ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे देयक उशिरा अदा केल्यानंतर लागणारा विलंब आकार कुणी भरायचा, असा सवाल सद्या उपस्थित होत आहे. महावितरणने ही बाब गांभीर्याने घेवून लवकरात लवकर देयकांचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.
कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने ‘मीटर रिडींग’ घेणाºया आणि देयकांचे वितरण करणाºया यापुर्वीच्या एजन्सीकडील काम काढून घेत नव्या एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे ‘रिडींग’ चोख घेतल्या गेले; परंतु नव्या एजन्सीमधील कामगारांना अनेक ग्राहकांची घरे माहित नसल्याने देयक वाटप करण्यास विलंब लागत आहे. तथापि, मुदतीनंतर देयक हाती पडल्यास ग्राहकांनी तशी माहिती महावितरणला कळवावी. संबंधितांना निश्चितपणे विलंब आकार लागणार नाही.
- व्ही.बी.बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरणचालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही.