मंगरुळपीर : नागपुर येथे २७ ते २९ आॅक्टोंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय आटयापाट्या स्पर्धेत मुले व मुली राज्यस्तरीय ज्युनिअर आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत वाशिम जिल्हा आट्यापाट्या संघाने प्रथम स्थान पटकाविले. या राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत एकुण २४ मुलांच्या संघाने सहभाग घेतला होता.
उपांत्य फेरीत जळगाव संघावर एकतर्फी मात करुन वाशिम जिल्हा आट्यापाट्या संघाने अंतीम सामन्यात प्रवेश मिळविला आणि अंतीम सामन्यात उस्मानाबाद संघावर सुध्दा एकतर्फी २ - ० ने विजय मिळविला व प्रथम स्थान पटकाविले. वाशिम जिल्हा आट्यापाट्या संघाचे खेळाडू सुमित मुंढरे ,वैभव तिडके, अजित बुरे, कविश्वर भोयर, हर्षल निवाणे, प्रतिक गवई, सौरभ ताजणे, रोशन चव्हाण, ऋषीकेश देशमुख, सुयोग जळंबे, राहुल ठाकरे, कृष्णा नरडे यांचा समावेश होता. या संघाचा सत्कार करतांना पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणुन मनपा क्रिडा समितीचे सभापती नागेश सहारे, महाराष्ट्र आटयपाट्या महामंडळाचे अध्यक्ष प्रा.अरुण गडकरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली बावनकर, आट्यापाट्या फेडरेशनचे आॅफ इंडियाचे सचिव डॉ.अशोक पाटील, महाराष्ट्र राज्य आटयापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दिपक कवीश्वर, माधवराव वानखडे, स्पर्धेचे संयोजक डॉ.अमरकांत चकोले, तसेच जय गजानन क्रिडा मंडळाचे अध्यक्ष संजय मिसाळ आणि वाशिम जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ.विवेक गुल्हाणे आदिंनी कौतुक केले.