वाशिम: सदोदित अस्वच्छ राहणाºया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने आता मात्र स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवायला सुरूवात केली असून आरोग्यविषयक उपक्रमांनाही गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
२०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आजही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. अशाही स्थितीत सप्टेंबर महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाने मोतिबिंदूच्या ७४ रुग्णांवर अंतरभिंगावरोपन (लेन्स) नेत्र शस्त्रक्रिया केल्या. याशिवाय १ नोव्हेंबरला २५; तर ८ नोव्हेंबरला ३१ अशा एकूण ५६ महिलांवर राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तथापि, आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आणि बुधवारी होणाºया कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांनी केले आहे.