वाशिम : जिल्हास्तरीय कृषी महोत्सव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या प्रक्षेत्रावर होत असल्याचे ‘आत्मा’ने १० दिवसांपूर्वी कळविले होते. मात्र, त्याठिकाणी हा महोत्सव घेण्यास परवानगी न मिळाल्याने कार्यक्रमाच्या स्थळात बदल करून आता काटा-कोंडाळा चौकात बुधवार, २१ फेब्रूवारीला हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. डी.एल. जाधव यांनी सोमवारी दिली.आधी वाशिम शहरातील जिल्हा क्रीडांगण, नंतर मालेगाव रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे प्रक्षेत्र आणि आता काटा-कोंडाळा चौक येथे हा महोत्सव होत आहे. वास्तविक पाहता हा उपक्रम शेतकºयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असण्यासोबतच शासकीय कार्यक्रम असल्याने स्थळ निश्चिती अथवा इतर तत्सम नियोजन चोख असणे क्रमप्राप्त आहे. मात्र, असे न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. दरम्यान, आता स्थळ अंतीम झाले असून महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड राहतील. ऊर्जा, पर्यटन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे सह पालकमंत्री मदन येरावार, नगरविकास, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषद कृषी सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, विभागीय कृषि सहसंचालक एस. के. नागरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. वाशिम येथील जिल्हा क्रीडांगणावर क्रीडा स्पर्धा होत असल्याने हे स्थळ महोत्सवाकरिता उपलब्ध होऊ शकले नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विज्ञापिठाच्या प्रक्षेत्रावर महोत्सव आयोजित करता येणार नाही, असे कळविण्यात आल्यानेच अखेर काटा-कोंडाळा चौक येथे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. - - डॉ.डी.एल.जाधव, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’, वाशिम
वाशिम जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या स्थळात पुन्हा बदल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 3:42 PM
वाशिम : कार्यक्रमाच्या स्थळात बदल करून आता काटा-कोंडाळा चौकात बुधवार, २१ फेब्रूवारीला हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. डी.एल. जाधव यांनी सोमवारी दिली.
ठळक मुद्देजिल्हास्तरीय कृषी महोत्सव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या प्रक्षेत्रावर होत असल्याचे ‘आत्मा’ने १० दिवसांपूर्वी कळविले होते. आता काटा-कोंडाळा चौक येथे हा महोत्सव होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे.