वाशिम: शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या विज्ञान मेळाव्यात सहभागी होऊन विविध अभ्यासपूर्ण प्रतिकृती सादर करणाऱ्या शाळांकरिता जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथे २२ जानेवारीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रतिकृतींसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक विद्यार्थी गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विनय मंगलप्रसाद सिंग्रोल या विद्यार्थ्याच्या ‘वनस्पतीचे अवयव व कार्य’ या प्रतिकृतीस प्रथम क्रमांक मिळाला आहे. सुराळा येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विजय राऊतने व्दितीय, सावरगाव जिरे येथील जि.प. शाळेच्या ओम गवळीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. माध्यमिक विद्यार्थी गटातून अनसिंग येथील विद्यालयाच्या सुरज अनिल घटमालच्या ‘विद्यूत निर्मिती’ या प्रतिकृतीस प्रथम क्रमांक मिळाला आहे. ज्ञानराज माऊली विद्यालय तोरनाळाच्या मिलींद देशमुखने व्दितीय; तर सुपखेला येथील सैनिक शाळेच्या प्रशांत लकडे या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच प्राथमिक शिक्षक गटातून स्वामी विवेकानंद शाळा अनसिंग, माध्यमिकमधून सुशिलाताई जाधव विद्यानिकेतन वाशिमला, लोकसंख्या प्राथमिक शिक्षक गटातून समर्थ मराठी प्राथमिक शाळा वाशिम; तर लोकसंख्या माध्यमिक शिक्षक गटातून सैनिक शाळा सुपखेला वाशिमने प्रथम क्रमांक मिळविला आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थी, शाहा व शिक्षकांनी येत्या २२ जानेवारीला जऊळका रेल्वे येथे होत असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत आपापल्या प्रतिकृतींसह सहभागी व्हावे. याअंतर्गत मंगळवार, २३ जानेवारीला राज्यस्तरीय स्पर्धेकरिता प्रतिकृतींची निवड करण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना २४ नोव्हेंबरला बक्षिसांचे वितरण केले जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी जऊळका रेल्वे येथे २२ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:23 PM
वाशिम: शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या विज्ञान मेळाव्यात सहभागी होऊन विविध अभ्यासपूर्ण प्रतिकृती सादर करणाऱ्या शाळांकरिता जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथे २२ जानेवारीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे प्रतिकृतींसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २३ जानेवारीला राज्यस्तरीय स्पर्धेकरिता प्रतिकृतींची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना २४ नोव्हेंबरला बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे.