वाशीम : युवकांमध्ये खेळाप्रती रुची निर्माण व्हावी यासाठी क्रीडा व युवा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचालित नेहरू युवा केंद्र वाशीम व स्वामी विवेकानंद युवा मंडळ भट उमरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राजस्थान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सांघिक प्रकारात पुरुष गटात कबड्डी मध्ये लोभिवंत क्रीडा मंडळ रामनगर प्रथम , जय बिरसा संघ वाशीम संघाने व्दितीय क्रमांक पटकावला. हॉलीबॉल जय बजरंग क्रीडा मंडळ मालेगाव प्रथम, आर. ए. कॉलेज व्दितीय, महिला कबड्डी जय महाराष्ट्र युवती संघ वाशीम प्रथम , जय भोले क्रीडा मंडळ व्दितीय, हॉलीबॉल प्रगती युवती मंडळ प्रथम , जय जिजाउ मंडळ व्दितीय. तर वयक्तिक क्रीडा प्रकारात पुरुष गटात १०० मी. धावणे किसान कोरडे प्रथम , नरेश राठोड व्दितीय , गोळा फेक आकाश सोलनोर प्रथम , दीपक दुबे व्दितीय, लांब उडी किसान कोरडे प्रथम, धनंजय चव्हाण व्दितीय, महिला १०० मी धावणे प्रगती सावळे प्रथम, ज्योती साबळे व्दितीय, गोळा फेक शीतल वानखेडे प्रथम गुणमाला लठाड व्दितीय, लांब उडी शीतल वानखेडे प्रथम, निशा नरवाडे यांनी व्दितीयक्रमांक पटकावला या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण प्रा. प्रविण गोटे , प्रा. मोहन चौधरी, अमोल गोटे, विश्वास खंदारे, दीपक गोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेसाठी नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक देव इंगोले, राजेंद्र गायकवाड, परवीन पट्टेबहादूर, आकाश काकडे, निलेश अंभोरे , अनिल चतरकर , संदीप राऊत, एकनाथ राठोड, अजय परसे, आशिष धोंगडे यांनी परिश्रम घेतले .