लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले. यावर तोडगा न निघाल्यास १९ व २० मार्च रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शासन दरबारी विविध मागण्या प्रलंबित असून, आंदोलनाच्या माध्यमातून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न गुरुवारी करण्यात आला. जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता देणे, जि.प. अभियंत्यांना प्रवासभत्त्यापोटी दरमहा किमान १० हजार रुपये मासिक वेतनासोबत अदा करणे, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग तत्काळ निर्माण करणे, जिल्हा परिषदेकडील अभियंता सवंर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्या बाबत करावयाची वेतन निश्चिती, जलसंपदा विभागाकडील ६ डिसेंबर २०१४ रोजीच्या निर्णयाप्रमाणे करण्याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश निर्गमित करावा, जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्या अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदे विशेष बाब म्हणून तत्काळ भरण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदांच्या प्रमाणात पुनर्विलोकीत करण्यात यावा, जिल्हा परिषदेच्या अभियंता संवर्गास अतांत्रिक कामे न देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात यावा, जि.प. अभियंता संवर्गासाठी जीवनदायी आरोग्य विमा योजना लागू करण्यात यावी, जि.प. कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेले २१ एप्रिल २००६ चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, आदी मागण्याच्या पुर्ततेसाठी अभियंता संघटनेने गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले.
वाशिम : जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे काळ्या फिती लावून कामकाज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 8:15 PM
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले. यावर तोडगा न निघाल्यास १९ व २० मार्च रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
ठळक मुद्देसामुहिक रजा आंदोलनाचा इशारा शासनाला दिले निवेदन