वाशिम : जिल्हयातील सहाही पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण आज, ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात जाहीर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. होते.
वाशिम पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मंगरूळपीर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, मानोरा व मालेगाव पंचायत समिती पदाचे आरक्षण सर्वसाधारण (महिला) आणि रिसोड व कारंजा पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. सोडत सभेला सहायक जिल्हाधिकारी मिन्नू. पी.एम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, कार्यालय अधीक्षक राहुल वानखेडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे तथा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.