मालेगाव: तीन वर्षांपूर्वी नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयालाच विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.तीन वर्षांपूर्वी सुसज्ज इमारतीत मालेगाव ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. अल्पावधीतच येथे भौतिक असुविधा व वैद्यकीय उपकरणांची उणिव जाणवते. येथे जनरेटरची सुविधा नाही. त्यामुळे वीजपुरवठा गूल झाला तर रात्री रूग्णांना अंधारातच राहावे लागते. ‘इसीजी’ मशिन बंद आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच अनेक ठिकाणी नादुरूस्त आहे. परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीदेखील सोयीनुसार रूग्णालयात येत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकही प्रभारी असून, तेदेखील गत काही दिवसांपासून मालेगावात आलेच नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला सकाळी १० वाजताच्या सुमारास भेट देऊन आढावा घेतला. कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचाºयांनी रूग्णालयातच राहावे, अशा सूचना देतानाच, दांडीबाज कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, असा इशाराही डॉ. राऊत यांनी दिला. तसेच मालेगाव येथील प्रभारी अधीक्षकपदाचा डॉ. अविनाश झरे यांच्याकडून काढला जाईल आणि सदर प्रभार अन्य वैद्यकीय अधिकाºयांकडे सोपविला जाईल, असेही डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. मालेगाव ग्रामीण रुग्णालयात भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जातील. रूग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.
वाशिम जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचा आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:26 PM
मालेगाव: तीन वर्षांपूर्वी नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयालाच विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.
ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी सुसज्ज इमारतीत मालेगाव ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. अल्पावधीतच येथे भौतिक असुविधा व वैद्यकीय उपकरणांची उणिव जाणवते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला सकाळी १० वाजताच्या सुमारास भेट देऊन आढावा घेतला.