वाशिम : निती आयोगामार्फत देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या ११५ जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यांचा विकास साधण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्हा राज्यात अव्वल ठरत आहे.मागास भागातील जिल्ह्यांचा विकास व्हावा उद्देशाने केंद्र सरकारच्या नीती आयोगाने देशातील ११५ जिल्ह्यांची निवड जानेवारी २०१८ मध्ये केली होती. कृषी, शिक्षण, आरोग्य आणि आहार, आर्थिक स्वायत्तता व कौशल्य विकास तसेच पायाभूत सुविधा या पाच निकषांच्या आधारे जिल्ह्यांची यादी तयार केली. यामध्ये महाराष्ट्रातील वाशिम, उस्मानाबाद, गडचिरोली व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचा समावेश आहे. मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात. शिक्षण, आरोग्य, कृषी, आर्थिक घटक, कौशल्य विकास आणि मूलभूत सुविधा या आधारावर देशातील आकांक्षित जिल्ह्यांचे दर महिन्याला मूल्यमापन करण्यात येते. या मुल्यमापनात राज्यात वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे. फेब्रुवारी २०१९ या महिन्यात तर मुल्यमापनात देशात वाशिम जिल्हा प्रथम क्रमांकावर होता.
निती आयोगाच्या मुल्यमापनात वाशिम जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 6:14 PM
योजनांच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्हा राज्यात अव्वल ठरत आहे.
ठळक मुद्दे मुल्यमापनात देशात वाशिम जिल्हा प्रथम क्रमांकावर होता.महाराष्ट्रातील वाशिम, उस्मानाबाद, गडचिरोली व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचा समावेश आहे.