लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अत्यल्प रकमेत ३.५ किलो सोने देतो, अशी बतावणी करून पुण्याच्या इसमाला उमरखेड (जि.यवतमाळ) येथे बोलावून १२ लाखांनी लुटल्याच्या घटनेत सहभागी वाशिम जिल्ह्यातील दोन्ही पोलिस कर्मचाºयांना पोलिस सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेसी यांनी शिरूर, जि. पुणे येथील रणजीत पांडूरंग गायकवाड यांना कमी किंमतीत ३.५ किलो सोने देण्याची बतावणी करून गायकवाड यांना सोने न देता उलटपक्षी धमकावून त्यांच्याजवळचे १२ लाख रुपये पोबारा केला. मुकेश श्रीराम गौरखेडे (३५) आणि कैलास मंगूसिंग राठोड (४०) अशी या घटनेतील आरोपी पोलिसांची नावे असून गौरखेडे हा मंगरुळपीर पोलीस ठाण्यात, तर राठोड हा कारंजा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. या दोघांशिवाय रवी श्यामराव कानडे (२३, रा. मथनी, ता. मानोरा) याला पोलिसांनी १८ मार्च रोजी ताब्यात घेतले होते. १९ मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना उमरखेड (जि.यवतमाळ) येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत वाशिमचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलिस दलातील दोन्ही आरोपी कर्मचाºयांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा राठोड यांनी कळविली.
वाशिम जिल्ह्यातील ‘ते’ दोन पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 4:18 PM