वाशिम : जिल्ह्यात वार्षिक सरासरी ८८५ मि.मी. पाऊस पडतो, तर १ जून ते ३१ जुलैदरम्यान सरासरी ४१० मि.मी. पाऊस पडतो. त्यात गतवर्षी याच कालावधित २९० मि.मी. पाऊस पडला होता. अर्थात गतवर्षी पावसाच्या सरासरीत २९.९३ टक्क्यांची तूट होती. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस पडत असल्याने १ जून ते ३१ जुलैपर्यंत ५२४.६ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५७ टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडत आहे. जुन ते जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पातील पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा पावसाळ्यातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे प्रकल्पांतील जलसाठा ५३.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत मिळून ७७.६० टक्के साठा झाला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ७० टक्के, मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पात १०० टक्के, तर कारंजा तालुक्यात आणि मानोरा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या अडाण प्रकल्पात ७३ टक्के जलसाठा झाला आहे. शिवाय जिल्ह्यातील १३१ लघू प्रकल्पांत मिळून सरासरी ४६.९० टक्के जलसाठा झाला आहे. तथापि, काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने लघू प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ होऊ शकली नाही. त्यात ४३ प्रकल्पांची पातळी अद्यापही २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना संंबंधित परिसरात दमदार पाऊस पडण्याची प्रतिक्षा आहे. उर्वरित प्रकल्पांत मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा असल्याने या प्रककल्पांवर अवलंबून असलेल्या विविध पाणी पुरवठा योजना सुूरळीत चालण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पाणी टंचाईचे सावट दूरगतवर्षीच्या अपुºया पावसामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत जवळपास २५ गावांत पाणीटंचाईची समस्या कायम होती. या गावांत टँकरसह इतर उपाय योजना सुरू होत्या. तथापि, समाधानकारक पावसामुळे त्यातील जवळपायस २४ गावांतील पाणीटंचाईच्या उपाय योजना ३० जूनपर्यंतच बंद करण्यात आल्या, त्यानंतर मानोरा तालुक्यातील गलमगाव येथील विहीर अधिग्रहणाची योजनाही बंद करण्यात आली. जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी पाहता यंदा फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही.
दुबार पेरणीचे संकटजिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवण्याचे प्रकार घडल्याने शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. बियाणे न उगवल्याच्या ४३३४ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. कृषी विभागाने तक्रारीनुसार शेतकºयांच्या शेताला भेटी देऊन पाहणी केली. त्यात ८९ तक्रारीत बियाणे सदोष आढळले आहेत.