वाशिम: संगणकीय सातबारा प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणारा वाशिम जिल्हा याच प्रक्रियेतील डिजिटल सातबारा मोहिमेत पिछाडीवर पडला होता. याचा फटका शेतकºयांना बसण्याची चिन्हे असल्याने लोकमतने ४ मे रोजी ‘डिजिटल सातबारा प्रक्रियेत जिल्ह्याची पिछेहाट’ या मथळ्याखाली, तसेच १८ मे रोजी डिजिटल सातबाराची प्रक्रिया संथच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात महसूल प्रशासनाची कान उघाडणी करून कामाला वेग देण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासनाने वेगाने काम करीत राज्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेत आठवे स्थान, तर विभागात पाचव्यावरून तिसºया स्थानी झेप घेतली. राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातील या कार्यक्रमांतर्गत संगणकीकृत सातबारांतील दुरुस्तीसाठी एडिट आणि रिएडिट या प्रक्रिया पार पडल्या. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्याने राज्यात सर्वोत्कृ ष्ट कामगिरी केली. आता सातबारा अद्ययावतीकरणाची अंतिम प्रक्रिया म्हणून शेतकºयांच्या सातबारांवर तलाठ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया अर्थात डिजिटल सातबारा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र ही प्रक्रिया संथगतीने सुरू होती. महसूल प्रशासनाकडून यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नव्हते. शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या या कागदपत्राच्या अद्ययावतीकरणास विलंब होत असल्याने लोकमतने ४ मे रोजी ‘डिजिटल सातबारा प्रक्रियेत जिल्ह्याची पिछेहाट’ या मथळ्याखाली, तसेच १८ मे रोजी डिजिटल सातबाराची प्रक्रिया संथच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी महसूल प्रशासनाला कडक निर्देश देताना कामाचा वेग वाढविण्यास सांगितले. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात या प्रक्रियेंतर्गत ८०९ गावांतील २४९२४५ सर्वे/ गट क्रमांकांपैकी २४ मे रोजीपर्यंत ८४ हजार ९२७ सातबारा डिजिटल स्वाक्षरी करून महाभूलेख संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. ४ मे रोजी केवळ ४.८८ टक्के असलेले प्रमाण आता ३४.०२ टक्क्यांवर पोहोचले असून, राज्यात वाशिम जिल्ह्याने टक्केवारीबाबत बीड जिल्ह्यासह संयुक्त सातवे, तर प्रमाणाबाबत ८ वे स्थान पटकावले आहे. दरम्यान, या प्रक्रियेत उस्मानाबाद जिल्हा ९०.८३ टक्क्यांसह पहिल्या, जालना जिल्हा ७२.२५ टक्क्यांसह दुसºया, नांदेड ७२.०५ टक्क्यांसह तिसºया, हिंगोली ५३.९९ टक्क्यांसह चौथ्या,अकोला ४६.५६ टक्क्यांसह पाचव्या आणि यवतमाळ३९.८३ टक्क्यांसह सहाव्या स्थानावर आहे. डिजिटल स्वाक्षरी सातबारा सर्व शासकीय आणि निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी या संगणकीय सातबारावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही. कमी वेळेत, कमी श्रमात शेतकºयांना सातबारा उपलब्ध करण्याचा हा उपक्रम शेतकºयांच्या हिताचा आहे.
डिजिटल सातबारा प्रक्रियेत वाशिम राज्यात आठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 4:52 PM
जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात महसूल प्रशासनाची कान उघाडणी करून कामाला वेग देण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासनाने वेगाने काम करीत राज्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेत आठवे स्थान, तर विभागात पाचव्यावरून तिसºया स्थानी झेप घेतली.
ठळक मुद्दे २४ मे रोजीपर्यंत ८४ हजार ९२७ सातबारा डिजिटल स्वाक्षरी करून महाभूलेख संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. ४ मे रोजी केवळ ४.८८ टक्के असलेले प्रमाण आता ३४.०२ टक्क्यांवर पोहोचले. राज्यात वाशिम जिल्ह्याने टक्केवारीबाबत बीड जिल्ह्यासह संयुक्त सातवे, तर प्रमाणाबाबत ८ वे स्थान पटकावले आहे.