लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातून पुसद आणि शेलूबाजारकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला असलेल्या शासकीय जमिनीवर शेकडो लोकांनी अतीक्रमण करून कच्चा स्वरूपातील घरे थाटली. काही भूखंडांची परस्पर विक्री देखील करण्यात आली. याप्रकरणी सर्वप्रथम ‘लोकमत’ २१ एप्रिल २०१९ च्या अंकात ‘महसूल आणि नझूलची जमीन अतीक्रमणाच्या विळख्यात’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतरही विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून हे प्रकरण उजेडात आणले. त्याची दखल घेत रविवार, २ जूनपासून चोख पोलिस बंदोबस्तात सदर अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाच्या वतीने प्रारंभ करण्यात आला.खदान परिसर म्हणून वाशिमकरांना परिचित असलेल्या वाशिम-शेलू मार्गावरील गट क्रमांक ४४६ आणि ४४७ मध्ये साधारणत: २५ एकर ई-क्लास जमीन वसलेली आहे. याच परिसरात मोठा उड्डानपूल तयार होत असल्याने या जागेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. परिसरात प्रामुख्याने मुरूम हे गौणखनिज निघत असल्याने त्यापासून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो; मात्र गत २० ते २५ वर्षांच्या कालावधीत या जमिनीवर काही लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून घरे थाटली आहेत; तर काहीठिकाणी सिमेंट पोल, तार फेन्सींगव्दारे जागा अडवून ठेवण्यात आली. विशेष गंभीर बाब म्हणजे वाशिमवरून शेलुबाजारकडे जाणाºया रस्त्याच्या एका बाजूला असलेले मानमोठे नगर आणि दुसºया बाजूला असलेल्या ख्रिश्चन समाजबांधवांच्या स्मशानभूमीपर्यंत महावितरणनेही विद्यूत खांब उभे करून अतिक्रमणधारकांच्या मागणीप्रमाणे विजपुरवठा दिला आहे. या सर्व बाबी ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केल्या. दरम्यान, या वृत्तांची तडकाफडकी दखल घेत वाशिमचे जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी २१ एप्रिल रोजीच तहसीलदारांना निर्देश देत अतीक्रमणधारकांच्या सर्वेक्षणास सुरूवात केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, भूमी अभिलेखचे उपअधिक्षक आदी अधिकाºयांचे ‘अतिक्रमण निष्कासित पथक’ गठीत करून २ जूनपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्यास सुरूवात करण्यात आली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाशिममध्ये शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण हटविणे सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 3:37 PM