लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंत शिक्षण आणि निवासासह इतर सर्व सुविधा पुरविणा-या जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा १० फेब्रूवारीला होत आहे. वाशिम जिल्ह्यातून या परीक्षेसाठी ७ हजार ६६८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी मंगळवारी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याकरिता मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, वाशिम ‘ब्लॉक’मधून ११२३ विद्यार्थ्यांनी ‘आॅनलाईन’; तर ९५३ विद्यार्थ्यांनी ‘आॅफलाईन’ नोंदणी केली. रिसोड ‘ब्लॉक’मधून एकंदरित १५२८, मालेगावातून १२४५, मंगरूळपीर येथून १०१६, कारंजा येथून ९२५; तर मानोरा तालुक्यातून ८७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संंबंधितांची परीक्षा १० फेब्रूवारीला होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहाही तालुकास्थळी ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.