लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंंग (वाशिम): नाफेडच्यावतीने वाशिम तालुका खरेदी विक्री संघाने गतवर्षी (२०१७-१८३) मध्ये करण्यात आलेल्या खरेदीत शासनाची मुदत संपल्यानंतर आॅफलाईन पद्धतीने हरभºयाची खरेदी केली होती. तथापि, नाफे डने हा हरभरा घेण्यास नकार दिला. त्यामुळे ४९ शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित होता. आता या शेतकºयांचा ३० लाख रुपयांचा मोबदला जिल्हा पणन अधिकाºयांक डून अदा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.वाशिम तालुका खरेदीविक्री संघाने शासनाच्या हमीभावाने शेतमाल खरेदी योजनेंतर्गत गतवर्षी उडिद, मुग, तूर, सोयाबीन आणि हरभºयाची खरेदी केली होती. त्यात अनेक शेतकºयांचा हरभरा शासनाची मुदत संपल्यानंतर आॅफलाईन पद्धतीने खरेदी करण्यात आला. तथापि, नाफेडने हा हरभरा घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि या प्रकरणी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हेही दाखल झाले. त्यामध्ये ४० लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या प्रकरणी शासन, संस्था आणि जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला नोटीसही बजावण्यात आली होती. ही याचिका अद्यापही प्रलंबित आहे. यात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वाशिम व जिल्हा पणन कार्यालय वाशिम यांच्याशी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी चर्चा केली व शेवटी खरेदी विक्री संस्था हरभºयाच्या आॅफलाईन खरेदीला जबाबदार असल्यामुळे या हरभºयाच्या खरेदीपोटी असलेली कमीशनची रक्कम ३० लाख ५४ हजार ८० रुपये जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाने सहाय्यक निबंधक मुख्य असलेल्या खात्यावर वर्ग केली. त्यानंतर सहाय्यक निबंधक कार्यालयाने रकमेतून हरभºयाच्या शासन हमीभावानुसार ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे ४९ शेतकºयांचा मोबदला धनादेशाद्वारे अदा केला. त्यामुळे ४० शेतकºयांना दिड वर्षानंतर हरभºयाचा मोबदला मिळाला आहे.
वाशिम: ४९ शेतकऱ्यांना दीड वर्षाने मिळाला हरभऱ्याचा मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 6:16 PM