वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर १७ मार्चपासून शाळा बंद असून, या शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचे धान्य संबंधित विद्यार्थ्यांना ३० मार्चपासून दिले जात आहे. दरम्यान धान्य घेण्यासाठी पालकांची शाळा परिसरात गर्दी होत असून, येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळला जात नसल्याचे १ एप्रिल रोजी शिरपूरसह ग्रामीण भागात दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक घटकाकडून दक्षता घेतली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना १७ मार्चपासून सुट्या देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार पुरविला जातो. परंतू, शाळा बंद असल्याने आणि आता उन्हाळ्या्च्या सुट्टयाही लागणार असल्याने पोषण आहार योजनेंतर्गतचे उपलब्ध तांदूळ व अन्य धान्य संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात यावे, असे आदेश शिक्षण विभागाने २६ मार्च रोजी दिले. या आदेशानुसार धान्य घेऊन जाण्याच्या सूचना पालकांना दिल्या. धान्य घेताना गर्दी होत असल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ला हरताळ फासला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा; विद्यार्थिही उपस्थितशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ आणि खासगी अनुदानित १५० अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना ३० मार्चपासून धान्य दिले जात आहे. धान्याचे वितरण करताना गर्दी होऊ नये म्हणून विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगवून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतू, अनेक शाळा परिसरात विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविले नसल्याने तसेच दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर राखण्याची दक्षताही घेतली जात नसल्याने गर्दी होत असल्याचे चित्र शाळा परिसरात दिसून येते. विशेष म्हणजे काही पालक हे आपल्या पाल्यालादेखील शाळा परिसरात आणत असल्याचे १ एप्रिल रोजी दिसून आले.
शिरपूर येथे पालकांची गर्दीच्पोषण आहाराचा शिल्लक असलेला तांदूळ वरिष्ठांच्या सूचनेनंतर शिरपूर येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेमध्ये १ एप्रिल रोजी वाटप करण्यात आला.च्कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश दिलेले आहेत. विशिष्ट अंतर राखून नागरिकांनी सुरक्षितता राखावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. तथापि, या सुचनांचे पालन १ एप्रिल रोजी जि.प. कन्या मराठी शाळेत झाले नसल्याचे दिसून आले. तांदूळ घेण्यासाठी शाळेतील मुलींसह त्यांचे पालक मोठ्या संख्येत गर्दी करून हजर होते. तांदूळ वाटपासाठी वर्तुळे आखण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचे धान्य वाटप करताना विशिष्ट अंतरावर वर्तुळ आखावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. प्रशासनातर्फे आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करून गर्दी करू नये.- अंबादास मानकर शिक्षणाधिकारी