लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे.
यावर्षी अल्प पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून प्रशासनाने प्रकल्पांतील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, सदर निर्देश पेरणी पूर्ण झाल्यानंतर दिल्याने, प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर असलेल्या शेतकºयांना आता या निर्देशाचा जबर फटका बसत आहे. पेरणी करताना, प्रकल्पातून पाणी मिळणार नाही, असे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळेल, या आशेने शेकडो शेतकºयांनी गहू, हरभरा व अन्य पिके घेतली आहेत. मात्र, आता प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे बंद झाला. रब्बी हंगाम अर्ध्यावर आला असताना प्रशासनाने प्रकल्प परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंपाच्या जोडण्या खंडीत केल्या. सोनल प्रकल्पातून दरवर्षी जवळपास ८०० हेक्टरपेक्षा अधिक जमिन सिंचनाखाली येते. यावर्षी प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याने शेतकºयांची समस्या वाढली आहे. मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने इंझोरी परिसरातील पिके पाण्याअभावी कोमेजण्याची शक्यता आहे. शेतकºयांचा प्रखर विरोध असतानाही, इंझोरी परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंप जोडण्या प्रशासनाने खंडित केल्या. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न गहन बनला आहे. अडाण धरणामध्ये राखीव पाणी ठेवूनही जास्त साठा आहे. या अतिरिक्त साठ्यातून सिंचनासाठी पाणी द्या, अशी आर्त हाक शेतकºयांनी दिली. शेतात पेरलेले पीक घेण्यासाठी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी भूमिका घेत सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी इंझोरी परिसरातील शेतकºयांचा लढा सुरू आहे. मात्र, अद्याप कृषीपंप जोडण्या पूर्ववत झाल्या नाहीत. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.