मंगरुळपीर (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यात सद्यस्थितीत भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेकांना दूरवरुन पाणी आणण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. या निषेधार्थ तालुक्यातील कवठळवासियांनी तहसील कार्यालयावर २ एप्रिल रोजी मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.गावात पाण्याचा एकही थेंब नसल्याने कवठळवासियांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी गावातील पुरुष , महिलांनी तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढून कवठळ गावाला पाणी टंचाई मुक्त करा, पाणी पुरवठा करा यासह विविध घोषणा करीत तहसीलदारांना निवेदन दिले. तसेच लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी कवठळवासियांनी दिला. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह ग्रामस्थ व महिलांचा मोठया प्रमाणात समावेश होता.
वाशिम- कवठळवासियांचा तहसील कार्यालयावर घागर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 1:47 PM