लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : मुख्यमंत्री सहायता निधीमधून भामदेवी येथे व-हाड दुध प्रकल्प साकारला आहे. सदर दुधाची विविध उत्पादने १२ डिसेंबर रोजी विधान भवन, नागपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आली. सदर उत्पादनांची भेट वर्हाड दुग्ध उत्पादक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नामदेव आप्पा निंबलवार, भामदेवी चे सरपंच सुभाष मोहोकार, पोलिस पाटील पंडीत मेश्राम, बंडुभाऊ भेराणे, भुषण कस्तुरे, विपुल चाणेकर, पवण मुंदे तसेच संवर्धन चे डॉ. निलेश हेडा यांच्या हस्ते प्रदाण करण्यात आले. ‘मी स्वत: तुमची उत्पादने माज्या नागपुरच्या राहत्या घरी वापरुन बघणार आहे’ असे वक्तव्य माननीय मुख्यमंत्र्यांनी केले. बैठकीत वाशीम जिल्ह्यातील विविध समस्यांवर तब्बल दिड तास चर्चा झाली. बैठकीला वाशीम चे पालकमंत्री संजय राठोड, आमदार लखन मलीक, राजेंद्र पाटणी , जिल्हाधीकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद सिईओ गणेश पाटील तसेच अधिकारी उपस्थित होते.
वाशिम : मुख्यमंत्र्यांना भामदेवी येथील ‘वर्हाड’ दुध प्रकल्पातील पदार्थांची भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 7:18 PM
कारंजा : मुख्यमंत्री सहायता निधीमधून भामदेवी येथे वर्हाड दुध प्रकल्प साकारला आहे. सदर दुधाची विविध उत्पादने १२ डिसेंबर रोजी विधान भवन, नागपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात आली.
ठळक मुद्देनागपूर येथे पार पडली बैठक; मुख्यमंत्र्यांचे मागदर्शनजल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती