लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - कारंजा तालुक्यात सोमवार, १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उंबर्डा बाजार, धनज, दोनद परिीसरातील काही गावांना गारपीटिने झोडपले. परिसरातील गहू, हरभरा, संत्रा या पिंकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात त्वरीत नुकसानग्रस्त भागाचा सर्वे करण्याच्या सूचना आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा तहसिलदारांना दिल्या.११ फेब्रुवारीला मालेगाव व रिसोड तालुक्यास गारपिटीने झोडपले. कारंजा तालुक्यात अवकाळी पाउस व वा-यांचे प्रमाण मोठया प्रमाणात होते. दुस-या दिवशी, १२ फेबु्रवारी रोजी सांयकाळी ५ वाजताच्या दरम्यान कामठवाडा, इंझा, अनई, खेर्डा कारंजा, लोणी अरब, गंगापुर, निंबा जहागीर, दोनद, धानोरा ताथोड, तारखेडा, धनज, मेहा, सिरसोली, यावर्डी या ठिकाणी गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. गहु, हरभरा,संत्रा व भाजीपाल्याच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचा सर्व्हे करण्याच्या सुचना तलाठी यांना दिल्याची माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली.
वाशिम : कारंजा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 9:26 PM
कारंजा लाड (वाशिम) - कारंजा तालुक्यात सोमवार, १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उंबर्डा बाजार, धनज, दोनद परिीसरातील काही गावांना गारपीटिने झोडपले. परिसरातील गहू, हरभरा, संत्रा या पिंकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात त्वरीत नुकसानग्रस्त भागाचा सर्वे करण्याच्या सूचना आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा तहसिलदारांना दिल्या.
ठळक मुद्दे१२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास परिीसरातील काही गावांना गारपीटिने झोडपलेनुकसानग्रस्त भागांचा सर्वे करण्याच्या सूचना