लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय उभारण्याच्या बाबतीत वाशिम तालुका हा सर्वांत पिछाडीवर असून या मोहिमेत अडथळा ठरू पाहणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त पियुश सिंह यांनी दिले. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात गुरूवार, ८ फेब्रुवारीला पार पडलेल्या ग्रामसेवकांच्या आढावा सभेत आयुक्त सिंह यांनी ग्रामसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सहाय्यक उपायुक्त प्रिती देशमुख, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुका हगणदरीमुक्त झाल्यानंतर उर्वरित चारही तालुक्यांमध्ये शौचालय उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, शासनाने निर्धारित केलेल्या तारखांना तालुके हगणदरीमुक्त झाले नाहीत. वाशिम तालुका याबाबतील प्रचंड प्रमाणात पिछाडीवर असून २०० पेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम अद्याप बाकी आहे. त्यात अनसिंग, सावरगाव जीरे, पंचाळा, शेलगाव आणि वार्ला या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांच्या कार्यक्षमतेवर आयुक्त पियुश सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तथापि, येत्या सात दिवसात समाधानकारक काम न झाल्यास संबंधित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश सिंह यांनी दिले. त्याचबरोबर नमूद पाच ग्रामपंचायती वगळता ज्या ग्रामपंचायतचे शौचालय बांधकामाचे लक्ष्य (टार्गेट) ७० टक्क्याच्या वर आहे, त्यांना १८ फेब्रुवारी आणि ज्यांचे लक्ष्य ७० टक्क्याच्या आत आहे, त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. या कालावधीत काम न झाल्यास ग्रामसेवकांवर कारवाई करताना कुठलीच हयगय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.
वाशिम : हगणदरीमुक्तीत अडथळा ठरणा-या ग्रामसेवकांवर कारवाईची ‘टांगती तलवार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 7:56 PM
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय उभारण्याच्या बाबतीत वाशिम तालुका हा सर्वांत पिछाडीवर असून या मोहिमेत अडथळा ठरू पाहणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त पियुश सिंह यांनी दिले.
ठळक मुद्देआयुक्त पियुश सिंह यांचा इशाराकठोर कारवाई करण्याचे संकेत