लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): शहरातील गोयनका नगर परिसरातून क्रुझर आणि बोलेरो ही चारचाकी वाहने २४ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. विशेष बाब म्हणजे गोयनका नगर हे पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांवरील पोलिसांचा धाक मावळल्याचे या घटनेवरून पुन्हा एकवेळ सिद्ध झाले आहे.मालेगाव येथील सुमित सत्यनारायण मुंदडा (वय ४१ वर्षे, रा. गोयनका नगर) यांनी २५ डिसेंबर रोजी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की नेहमीप्रमाणे गोयनका नगरातील कृषी सेवा केंद्राजवळ त्यांची सिल्व्हर रंगाची क्रुझर (क्र. एम एच ३७ व्ही ०१७८, किंमत ७ लाख रुपये) तसेच शेख मुगील शेख इब्राहीम यांची बोलेरो (क्र.एम.एच.३७ जी ५१८६, किमत ५ लाख रुपये) ही गाडी उभी होती. २४ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ही दोन्ही वाहने लंपास केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धोत्रे करित आहेत.
वाशिम : मालेगावात वाहनचोरट्यांचा हैदोस; चारचाकी वाहने लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 7:22 PM
मालेगाव (वाशिम): शहरातील गोयनका नगर परिसरातून क्रुझर आणि बोलेरो ही चारचाकी वाहने २४ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. विशेष बाब म्हणजे गोयनका नगर हे पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देपोलिसांचा धाक मावळलानागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण