वाशिम जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ८७.३७ टक्के निकाल : निकालात रिसोड तालुका आघाडीवर तर मालेगाव तालुका माघारलालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ८७.३७ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.०२ तर मुलींची टक्केवारी ९०.४८ आहे. जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २९२ शाळांमधून २० हजार ९३२ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी २० हजार ८१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ११ हजार ८७३ मुले व ८ हजार ९४३ मुलींचा समावेश आहे. यापैकी १८ हजार १८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १० हजार ९४ मुले व ८ हजार ९२ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.०२ तर मुलींची टक्केवारी ९०.४८ आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल रिसोड तालुक्याचा ९०.२५ टक्के तर सर्वात कमी निकाल मालेगाव तालुक्याचा ८४.४४ टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेतही रिसोड तालुक्याचाच सर्वाधिक निकाल होता, हे विशेष.वाशिम तालुक्यातील ६२ शाळांमधून ५१४६ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ५०७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८७.९८ अशी आहे. मालेगाव तालुक्यातील ३३ शाळांमधून २७०७ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी २७०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २२८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८४.४४ अशी आहे. रिसोड तालुक्यातील ५५ शाळांमधून ४३३८ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ४३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९०.२५ अशी आहे. कारंजा तालुक्यातील ५९ शाळांमधून ३५९३ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ३५८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३१११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८६.७५ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ४३ शाळांमधून २८८९ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी २८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८७.४३ अशी आहे आणि मानोरा तालुक्यातील ४० शाळांमधून २२५९ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी २२५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १९०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८४.८४ अशी आहे. जिल्ह्यातील २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जिल्ह्यात रिसोड तालुका अव्वलबारावीच्या परीक्षेत रिसोड तालुक्याचा निकाल जिल्ह्यात अव्वल होता. हीच परंपरा दहावीच्या निकालातही रिसोडने कायम राखली आहे. ५५ शाळांमधून ४३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ३८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९०.२५ अशी आहे. जिल्ह्यातील २.८४ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याच्या वर गुण घेतले आहेत. ३.५९ टक्के विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के दरम्यान, ५.३७ टक्के विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के दरम्यान, ७.५६ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ ते ८० टक्के दरम्यान, ९.७० टक्के विद्यार्थ्यांनी ७० ते ७५ टक्के दरम्यान, ११.७५ टक्के विद्यार्थ्यांनी ६५ ते ७० टक्के दरम्यान, १४.३० टक्के विद्यार्थ्यांनी ६० ते ६५ टक्के गुण घेतले आहेत. ३३.९५ टक्के विद्यार्थ्यांनी ४५ ते ६० टक्के दरम्यान गुण घेतले आहेत. वाशिम जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेतील पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४५.६४ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील २९२ शाळांमधून ११५४ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षार्थी म्हणून नोंदणी केली होती. यापैकी ११४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ४५.६४ आहे. मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ४७.२९ असून मुलांची टक्केवारी ४५.१७ अशी आहे.
अमरावती विभागात वाशिम द्वितीय
By admin | Published: June 14, 2017 2:46 AM