शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

वाशिम : लाच प्रकरणी कनिष्ठ अभियंता, लिपिकास तीन वर्षाचा कारावास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:37 AM

वाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या मंजूर विहिरीच्या अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने, लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता प्रमोद कळंबे व लिपिक दिनकर वानखडे या दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपयाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के. गौर यांनी ६ एप्रिल रोजी सुनावली.

ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल लघू पाटबंधारे विभागातील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या मंजूर विहिरीच्या अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने, लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता प्रमोद कळंबे व लिपिक दिनकर वानखडे या दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपयाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के. गौर यांनी ६ एप्रिल रोजी सुनावली.

मालेगाव तालुक्यातील वाकद येथील शेतकरी पांडूरंग बळीराम जाधव यांनी ८ जून २०१० रोजी सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत जाधव यांनी नमूद केले होते की, शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या शेतात विहीर खोदकामासाठी १ लाख रुपये मंजूर केले होते. या रक्कमेपैकी १० हजार,  २५ हजार व ३५ हजार रुपयाचे असे तीन धनादेश आपल्याला सुरुवातीला मिळाले. त्यानंतर २५ हजार रुपयाचा चवथा धनदेश मंजूर झाल्यानंतर सदर धनादेशाबाबत कनिष्ठ अभियंता कळंबे यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी लिपिक दिनकर वानखडे यांच्याकडे २ हजार रुपये द्या व धनादेश घेवून जा, असे म्हटले. याबाबत लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता लिपिक वानखडे यास २२०० रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर कळंबे यांनाही अटक करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते.या प्रकरणात विद्यमान न्यायालयाने एकूण ४ साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने विद्यमान न्यायाधिश गौर यांनी आरोपी प्रमोद कळंबे व दिनकर वानखडे या दोघांना कलम ७ व १३ अन्वये तीन वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपयाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. 

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय