लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी काळे असे भावाचे नाव आहे. वाशिम तालुक्यातील भट उमरा येथील रहिवाशी व वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी नेते डॉ. दामोदर रामजी काळे यांना जून २0१७ पासून किडनीच्या दूर्धर आजाराने ग्रासले होते. अकोला व औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमधील उपचाराअंती किडनी प्रत्यारोपन हाच एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा काळे कुटुंबीयांनी किडनी उपचार व प्रत्यारोपनासाठी गुजरात राज्यातील एका युरॉलॉजीकल हॉस्पीटल येथे डॉ. काळे यांना दाखल केले. यावेळी डॉ. काळे यांची कनिष्ठ बहिणी पार्डी आसरा येथील निवासी देवकाबाई वानखेडे यांनी स्वत:ची किडनी भावाला देण्यासाठी पुढाकार घेतला. गुजरातमधील नडियाद येथील हॉस्पीटलमध्ये डॉ. उमापती हेगडे व डॉ. राजापूरकर या डॉक्टरांनी दोन्ही भावा-बहिणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करीत किडनी प्रत्यारोपन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला काही दिवस डॉ. दामोदर काळे यांना सातत्याने व्हेंटीलेंटरवर रहावे लागले. सध्या दोन्ही बहिण-भावाची प्रकृती उत्तम असून माझी बहीणच माझ्यासाठी ईश्वर असून आपल्याला तिचा सार्थ अभिमान असल्याचे डॉ. दामोदर काळे यांनी सांगीतले. देवकाबाई यांनी घेतलेल्या निर्णयाचे जिल्ह्याभरात सर्व समाजस्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. देवकाबाई वानखेडे यांची प्रेरणा घेऊन मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प काळे कुटुंबीयांनी केला असल्याचे डॉ. दामोदर काळे यांचे चिरंजीव डॉ. विजय काळे यांनी सांगीतले.
वाशिम : भावाचा जीव वाचविण्यासाठी बाहिणीने केले ‘किडनीदान’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:36 AM
प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी काळे असे भावाचे नाव आहे.
ठळक मुद्देवाशिम तालुक्यातील भट उमरा येथील काळे परिवाराचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प