शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वाशिम : नव्या तुरीला हमीपेक्षा ७00 रुपये कमी भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:55 AM

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. 

ठळक मुद्देशेतकरी अडचणीतबाजारात नव्या तुरीची आवक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा ५0 हजार हेक्टरहून अधिक  क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. अपुरा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन या पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. अनेक शेतकर्‍यांना, तर तुरीचा खर्चही वसूल होणे कठीण झाल्याचे दिसत आहे. आता काही शेतकर्‍यांनी तुरीची काढणी करून ती बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे. आवक कमी असली तरी, व्यापारी वर्गाकडून तुरीची अतिशय कमी दरात खरेदी करण्यात येत आहे. गतवर्षी शासनाकडून तुरीला ५ हजार ५0 रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषित करण्यात आले होते, यंदा त्यामध्ये ५00 रुपयांची वाढ करून तुरीचे हमीभाव ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले; परंतु बाजारात मात्र शेतकर्‍यांची नवी तूर ६00 रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांकडील सोयाबीन संपल्यानंतर मात्र या शेतमालाच्या भावात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांकडून २७00 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येत असलेले सोयाबीन आता ३ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी केले जात आहे. अर्थात बाजार व्यवस्थेतील भाव पाडण्याच्या दृष्टचक्रामुळे शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात शासनानेच हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदीची सक्ती करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा शेतकर्‍यांकडील तूर शेवटच्या दाण्यापर्यंत हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी करून त्यांची लुबाडणूक कायमच राहणार आहे. 

शिल्लक असलेल्या जुन्या तुरीचे भाव गडगडले!नव्या तुरीचे भाव ओलाव्यामुळे कमी असल्याचे कारण बाजार व्यवस्थेकडून समोर करण्यात येत असले तरी, जुन्या तुरीला त्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत. सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुरीचीही बाजारात बर्‍यापैकी आवक होत आहे; परंतु या तुरीला अद्यापही ४000 हजार ते ४२00 रुपये प्रति क्विंटल दरानेच खरेदी करण्यात येत आहे. भाववाढीसाठी वर्षभर प्रतिक्षा  करूनही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येत असल्याचे यावरून दिसत आहे. या परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकर्‍यांची पिळवणूक थांबविण्यासाठी तातडीने नाफेडमार्फत तुरीची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.    

तुरीत ओलावा असल्यामुळे सध्या नव्या तुरीला ४५00 ते ४७५0 रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत; परंतु तुरीला मागणी असल्यामुळे या शेतमालाचे भाव अधिक वाढणार आहेत. सद्य:स्थितीत बाजारात या शेतमालाची आवकही नावापुरतीच होत आहे.- नीलेश भाकरेसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा लाड 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती