लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाने पित्याला जन्मठेप व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा २८ डिसेंबरला सुनावली. रिसोड तालुक्यातील बेलखेड येथे नराधमाने मुलगी-वडीलाच्या नात्याला काळीमा फासत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षापूर्वी अत्याचार केले होते. सदर मुलीची तपासणी अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ जुन २0१६ रोजी करण्यात आली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडीत मुलीने तिच्यावर पित्यानेच अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर शिरपूर पोलिसांनी पित्याविरोधात २८ जून २0१६ रोजी ३७६ (एन), ६ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. दरम्यान, पीडीत मुलीस नाशिक येथील वात्सल्य वसतीगृहात पाठविण्यात आला होते. ९ ऑगस्ट २0१६ मध्ये तिने एका अपत्यास जन्म दिला. जन्मानंतर अपत्य लगेच मरण पावले होते. सदर प्रकरणात १७ पुराव्यांची तपासणी केल्यानंतर जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश क्र,१ के. के. गौर यांनी आरोपीला जन्मठेप आणि १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अँड. अभिजीत व्यवहारे काम पाहीले.
डिएनए अहवाल ठरला महत्वाचा!पीडीत मुलीने दिलेल्या अपत्याचा आणि आरोपीची डिएनए चाचणी करण्यात आली. डिएनए चाचणीचा अहवाल आणि पीडीतेच्या साक्षीवरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.