वाशिम : गेल्या महिनाभरापासून टमाट्याचे दर १० रुपये प्रतिकिलोच्या खालीच असून ते आजही वाढलेले नाहीत. अशातच आर्थिक नुकसान सहन करित महत्प्रयासाने बाजारपेठेत विक्रीस येणारे टमाटर कडक उन्हामुळे खराब होत असल्याने शेतकऱ्यांसोबतच भाजीविक्रेतेही हैराण झाले आहेत. स्वयंपाकघरात अन्य भाजीपाल्यांप्रमाणेच टमाटरला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मोलमजूरी करणाऱ्या गोरगरिब कुटूंबांमध्ये टमाटरचे दर कमी असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दुसरीकडे मात्र लागवड खर्च आणि बाजारपेठेत टमाटर घेवून जाण्याकरिता लागणारा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टमाटर उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. यासह हर्रासीतून टमाटर घेवून ते बाजारपेठेत विक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांनाही तुलनेने लवकर खराब होणारे टमाटर विक्री करित असताना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून टमाटरची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यानेच दर खालावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिमच्या बाजारात टमाटरला केवळ ५ रुपये प्रतिकिलोचा दर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 3:05 PM
वाशिम : गेल्या महिनाभरापासून टमाट्याचे दर १० रुपये प्रतिकिलोच्या खालीच असून ते आजही वाढलेले नाहीत.
ठळक मुद्देटमाटर कडक उन्हामुळे खराब होत असल्याने शेतकऱ्यांसोबतच भाजीविक्रेतेही हैराण झाले आहेत. मोलमजूरी करणाऱ्या गोरगरिब कुटूंबांमध्ये टमाटरचे दर कमी असल्याने समाधान व्यक्त होत आहे.टमाटर घेवून जाण्याकरिता लागणारा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टमाटर उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.