वाशिम : शनिवारी रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्याने वाशिम येथील हिंगोली नाकास्थित भाजीबाजार परिसरात चिखल झाला. अशा परिस्थितीत ग्राहकांना रविवारी भाजीपाला खरेदी करावा लागला.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरात एकाच ठिकाणी भाजीबाजार न भरविता अनेक ठिकाणी बाजार भरविला जातो. हिंगोली नाकास्थित भाजीबाजारात मुलभूत सुविधा नाहीत. रस्त्णयाच्या कडेला भाजीबाजार भरत असून, तेथे नियमित साफसफाई, स्वच्छताही नाही. शनिवारी रात्रीदरम्यान पाऊस झाल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. याच ठिकाणी भाजीबाजार भरल्याने अनेकांनी खरेदीकडे पाठ फिरविली तर काही जणांनी गैरसोयीला सामोरे जात भाजीपाला खरेदी केला. नियमित स्वच्छता असावी !भाजीपाला बाजार भरत असलेल्या ठिकाणी नियमित साफसफाई, स्वच्छता आवश्यक आहे. हिंगोली नाकास्थित रस्त्याच्या कडेला भरत असलेल्या भाजीबाजारात नियमित साफसफाई नाही. तेथे मुरूम टाकून पाणी साचणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी होत आहे.
वाशिम : चिखलात भरला भाजीबाजार; ग्राहकांची गैरसोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 6:24 PM