लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज व जाहीरात बोर्ड काढण्याची कार्यवाही शहरात राबविण्यात आली. यामध्ये ६३ होर्डिग्ज व ४०० जाहिरात फलक, पोस्टर्स काढण्यात आलेत. यानंतर विनापरवानगी होर्डिग लावणारे नगरपरिषदेच्या रडारवर असून नियमांचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्या जाणार आहेत.उच्च न्यायालय व शासनाचे आदेशानुसार वाशिम शहरातील अनाधिकृत होर्डिंग्ज , जाहीरात बोर्ड काढण्यासाठी नगरपरिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली आहे. शहरात लावण्यात आलेले सर्व फलके काढून नगरपरिषदेने जप्त केली आहेत. यानंतर नगरपरिषदेच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतयाही प्रकारचे होर्डिग्ज किंवा जाहीरात बोर्ड अनधिकृतपणे लावण्यात आल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाच्यावतिने देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनाही याबाबत सूचना दयावयाची असल्यास टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. शहरात २८ आॅगस्टपासून शहरात ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता यानंतर ही मोहीम केव्हाही सुरु केल्या जाणार असून या मोहीमेत ज्या प्रतिष्ठानाचे फलक दिसेल त्यावर नियोजीत कारवाई केल्या जाणार आहे. तशा सूचनाही संबधितांना देण्यात आल्या आहेत. शहरात राबविण्यात आलेल्या या मोहीमेत अनेक डॉक्टर , कोचिंग क्लासेस, व्यावसायिकांचे फलक, बॅनर जप्त करण्यात आली आहेत.या मोहीमेमध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपलिकेच्या अतिक्रमण निमूर्लन अधिकारी रोशन सुर्वे यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती होती.शहरात लावण्यात आलेले होर्डीग, फलक हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. तरी वाशिम शहरातील नागरिकांनी यानंतर नगरपरिषदेच्या पूर्व परवानगीशिवाय शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे होर्डिग्ज किंवा जाहीरात बोर्ड लावून कारवाईस सामोरे जावू नये. नगर परिषदेच्या या मोहीमेस सहकार्य करावे.- गणेश शेटेमुख्याधिकारी,नगरपरिषद वाशिम
वाशिम नगरपरिषदेने ४६३ होर्डिंग, पोस्टर्स काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 3:15 PM
वाशिम : शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज व जाहीरात बोर्ड काढण्याची कार्यवाही शहरात राबविण्यात आली. यामध्ये ६३ होर्डिग्ज व ४०० जाहिरात फलक, पोस्टर्स काढण्यात आलेत.
ठळक मुद्देअनाधिकृत होर्डिंग्ज , जाहीरात बोर्ड काढण्यासाठी नगरपरिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाच्यावतिने देण्यात आला आहे.