शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

जिल्हयात सर्वाधिक कर वसुली वाशिम नगरपरिषदेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 3:27 PM

वाशिम :  जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते.

ठळक मुद्देवाशिम नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून ६ कोटी २८ लाख ३१ हजार २६९ व नळधारकांकडून ८० लाख ९१ हजार ४१९ रुपये असे एकूण ७ कोटी ६ लाख ८६ हजार ६३० रुपयांची वसुली केली. रिसोड नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून २ कोटी ३६ लाख २७ हजार ७७८ तर नळधारकांकडून २२ लाख १७ हजार ३६० असे एकूण ३ कोटी ५ लाख ८४ हजार १६६ रुपये वसुल केले. कारंजा नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून २ कोटी ९५ लाख २३ हजार ६१६ रुपये वसुल केले.

- नंदकिशोर नारे 

वाशिम :  जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते.

नगरपरिषदांचा करवसुली १०० टक्के व्हावी यासाठी नगरपरिषदेच्या प्रत्येक कर विभागाने प्रयत्न केलेत.पर्यांची वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाºयांची यादी प्रकाशित करणे व नोटीसा दिल्याने करवसुली चांगल्या प्रमाणात झालेली दिसून आली. या क्लुप्त्यांमुळे वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली होवून जिल्हयात सर्वाधिक करवसुलीत प्रथम ठरला आहे. यासाठी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या व कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, एम.डी. इंगळे, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद यांनी उत्कृष्ट कार्य केले. जिल्हयात चार नगरपालिका व दोन नगरपंचायतींनी केलेल्या करवसुलीमध्ये वाशिम नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून ६ कोटी २८ लाख ३१ हजार २६९ व नळधारकांकडून ८० लाख ९१ हजार ४१९ रुपये असे एकूण ७ कोटी ६ लाख ८६ हजार ६३० रुपयांची वसुली केली. जी ईतर नगरपालिका व नगरपंचायतीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे रिसोड नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून २ कोटी ३६ लाख २७ हजार ७७८ तर नळधारकांकडून २२ लाख १७ हजार ३६० असे एकूण ३ कोटी ५ लाख ८४ हजार १६६, कारंजा नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून २ कोटी ९५ लाख २३ हजार ६१६ रुपये वसुल केले. नळ कनेक्शन नसल्याने कोणत्याच प्रकारची वसुली नाही. मंगरुळपीर नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून १ कोटी ४० लाख ९३ हजार ५०५ व नळधारकांकडून २२ लाख १७ हजार ३६० रुपये असे एकूण १ कोटी ६३ लाख १० हजार ८६५ , मालेगाव नगरपंचायतने मालमत्ताधारकांकडून  ३५ लाख ५७ हजार २४८ व नळधारकांकडून  ५ लाख ६५ हजार ६५८ असे एकूण ४१ लाख २३  हजार रुपये तर मानोरा नगरपंचायतकडून  मालमत्ताधारकांकडून  १६ लाख ५५ हजार ९९६ व नळ धारकांकडून १० लाख ६४ असे एकूण २७ लाख १९ हजार ९९६ रुपये कराची वसुली केली.

 

कर विभागातील कर निरिक्षक ,संग्राहक यांच्या महतप्रयासाने नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ताधारकांची करवसुली चांगली झाली आहे. शहराचा विकास व सर्व सुविधा पुरवायच्या असल्यास करवसुली अतिशय महत्वाची आहे. नागरिकांनी स्वताहून कराचा भरणा केल्यास शहराचा विकास होण्यास वेळ लागत नाही. यासाठी कर विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी मोलाची भूमिका बजावल्याने आज नगरपरिषदेची करवसुली विक्रमी होवू शकली.            

 - गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिकाRisodरिसोडKaranjaकारंजा