शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

वाशिम : राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक रामेश्‍वर पवळ यांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:13 AM

वाशिम : धनादेश अनादरप्रकरणी  न्यायालयात तारखेवर वारंवार गैरहजर राहणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रामेश्‍वर पवळ यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा अकोला येथे अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ३0 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 

ठळक मुद्देधनादेश अनादर प्रकरण ३0 डिसेंबरपर्यंत कोठडी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : धनादेश अनादरप्रकरणी  न्यायालयात तारखेवर वारंवार गैरहजर राहणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रामेश्‍वर पवळ यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा अकोला येथे अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ३0 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. रामेश्‍वर पवळ यांच्याविरोधात वाशिम येथील जिल्हा न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणाची  सहा प्रकरणे सुरू आहेत. धनादेश अनादर प्रकरणाच्या   सुनावणीच्या प्रत्येक तारखेवर  पवळ हे वारंवार गैरहजर राहत होते. अखेर न्यायाधीशांनी पवळ यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वारंट जारी केला.  न्यायालयाच्या आदेशानंतर वाशिम शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बी.डी. अवचार, जमादार रमेश तायडे, राजेश बायस्कर, गणेश शिंदे, ज्ञानेश्‍वर म्हात्रे व सुषमा रंगारी यांचे पथक गेल्या आठवड्याभरापासून पवळ यांचा शोध घेत होते. पोलीस पथकाला  पवळ हे अकोला येथील तुकाराम चौकात त्यांच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २0 डिसेंबरच्या रात्री २ वाजता त्यांना अटक केली. गुरुवारी पवळ यांना जेएमएफसीच्या तीनही न्यायालयात हजर करण्यात आले. पवळ यांनी एका न्यायालयात पैसे भरले.  उर्वरित दोन न्यायालयात पैशांचा भरणा न केल्याने जेएमएफसी क्र. १ न्यायालयाने २७ डिसेंबर तर जेएमएफसी क्र. ५ न्यायालयाने ३0 डिसेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 

टॅग्स :washimवाशिमNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी