लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यपदांच्या रिक्त जागांकरिता येत्या २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी सोमवार, ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहेत. १२ फेब्रुवारीला प्राप्त अर्जांची छानणी केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.ग्रामपंचायत सदस्य, सरपंचपदाच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढविण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र देण्याच्या सवलतीस राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारास सक्षम प्राधिकाºयाने दिलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत दैनंदिन सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजतादरम्यान राबविली जाणार असून प्राप्त अर्जांची छानणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू होईल. तसेच १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी तीन वाजतानंतर संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल, असे कळविण्यात आले.
वाशिम : जिल्ह्यातील पोटनिवडणूकीसाठी सोमवारपासून स्विकारले जाणार नामनिर्देशपत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 7:14 PM
वाशिम : जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यपदांच्या रिक्त जागांकरिता येत्या २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी सोमवार, ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशपत्र स्विकारले जाणार आहेत. १२ फेब्रुवारीला प्राप्त अर्जांची छानणी केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.
ठळक मुद्देजिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यपदांच्या रिक्त जागांकरिता पोटनिवडणूक१२ फेब्रुवारीला प्राप्त अर्जांची छानणी केली जाईल