शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वाशिम :  १३०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:13 AM

पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा नसल्याने आरोग्य विभागाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

- संतोष वानखडे/ दादाराव गायकवाड  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आणि आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे याची सांगड घातली असता, १३०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी असल्याने आवश्यक सुविधा पुरविण्यात आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. ४४९ रिक्त पदे , पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा नसल्याने आरोग्य विभागाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, सहा ग्रामीण रुग्णालय, २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय मंजूर असून, अद्याप ते कार्यान्वित झाले नाही. जिल्ह्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण १४४९ पदे मंजूर असून, यापैकी ४४९ पदे रिक्त असल्याने एक हजार अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख २८ हजाराच्या घरात असल्याने एका कर्मचाºयावर सरासरी १३०० लोकांच्या आरोग्याची जबाबदारी येऊन पडली आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुरा निधी, याशिवाय पुरेशा प्रमाणात नसलेल्या भौतिक सुविधा यामुळे कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा देताना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. साधारणत: जीडीपीच्या ९ टक्के खर्च हा आरोग्यावर केला जावा, असा संकेत आहे. जिल्ह्यात जीडीपीच्या ०.६० टक्के खर्च हा आरोग्यावर होतो, असे सांगितले जाते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तसेच शासनाकडून आरोग्य विभागाला प्राप्त निधीमधून जवळपास ८५ ते ९० टक्के निधी खर्च होतो. जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असल्याने गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी मिळत असल्याचे दिसून येते. १०० खाटांचे जिल्हा स्त्री रुग्णालय मंजूर असून, भव्य इमारत बांधकामही झाले. परंतू, अद्याप लोकार्पण झाले नाही. यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होत आहे.

सेवा देण्यावर भरग्रामविकास विभागांतर्गत येत असलेली गट क व ड संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हास्तरीय सहायक पदे, वर्ग एक व वर्ग दोनही काही पदे रिक्त असल्याने सेवा देताना काही प्रमाणात अडचणी येतात. उपलब्ध मनुष्यबळानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषद वाशिम

कर्तव्य नियोजनावर भरसद्यस्थितीत जिल्ह्यात आमच्याकडे ५९९ पैकी २८५ विविध पदे रिक्त आहेत. त्यात काही महत्त्वाच्या पदांचाही समावेश आहे. यामुळे अडचणीत येत आहेत; परंतु उपलब्ध मनुष्य बळाचा नियोजनपूर्वक वापर करून कोरोना संसर्गाशी लढा देण्याचे आमचे प्रयत्न सुंरू आहेत. त्यात सर्वांचे सहकार्य मिळत असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वेळेत शोधून त्यांचेवर उपचार करणे शक्य होत आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या