मालेगाव : पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. भारिप-बमसंच्या लता रमेश अवचार, अपक्ष मनिषा धनंजय माने, अपक्ष संगिता सिद्धार्थ खिल्लारे या तीन उमेदवारांत टस्सल आहे. प्रत्येक उमेदवाराने डोअर टू डोअर प्रचार मोहिम राबविल्याने निवडणुकीत रंगत आली. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमधील १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण १२ हजारांच्या वर मतदार आहेत. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिले जाते. तिनही उमेदवार तुल्यबळ असल्याने निवडणुकीत बाजी कोण मारेल, याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वाशिम : पांगरी नवघरे पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:03 PM
मालेगाव : पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. भारिप-बमसंच्या लता रमेश अवचार, अपक्ष मनिषा धनंजय माने, ...
ठळक मुद्दे जिल्हा परिषद सर्कलमधील १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण १२ हजारांच्या वर मतदार आहेत. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.१३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे.