मंगरूळपीर - पाणी फांउडेशन व शासनाच्यावतीने मंगरूळपीर तालुक्याची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ३ करीता निवड झाली असून त्या दुष्टीने पिपळखुंटा ग्रामपंचायतच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पिपळखुंटा ग्रा .पं. चा सहभाग व पाच प्रशिक्षणार्थ्यांच्या निवडी संदर्भात ग्रासभा पार पडली. या ग्रामसभेत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गाव स्वंयस्फुतेर्ने सहभागी होणार असल्याचा ठराव संम्मत करण्यात आला तसेच होणा-या प्रशिक्षणासाठी पाच लोंकाची निवड करण्यात आली.
पिपळखुंटा ग्राम पंचायत येथे झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सुदर्शन घोटे तर प्रमुख अतिथी म्हणुन उपसरपंच प्रशात पडघान, मारोती पराडे, उपसरपंच प्रशांत पडघाण, दिनू पडघन हरिदास पराडे, उजेद पराडे, महादेव पराडे, भीमराव महल्ले, कांशीराम भोयर, पांडुरंग गावडे, बबनराव पराडे, नाना देवळे, फुलचंद भगत, तालुका समनव्यक प्रफुल बाणगावकर, देवेंद्र राउत यांची उपस्थिती होती. यावेळी या ग्रासभेला पाणी फाउडेशनचे तालुका समन्वयक यांनी माहीती सांगुन प्रशिक्षणासाठी कश्याप्रकारे ग्रामस्थानची निवड करायची या बाबात व्हिडीओ दाखविण्यात आला.
यावेळी गावकºयांनी मनोगत व्यक्त करून गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी गावकरी स्पर्धेतसहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी महिला व पुरुष वर्गाची उपस्थिती होती.