लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील रेल्वे स्थानक परिसरात उभे राहून अधिकृत कर्मचाºयांकडून चक्क जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून प्रवाशांकडून पैसे आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’व्दारे उघडकीस आणला. यासंदर्भात १४ जानेवारीच्या अंकात ‘रेल्वेच्या जुन्या तिकीटांवर लिहिला जातो आजचा प्रवास!’ या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेत हा गैरप्रकार तत्काळ बंद करण्यात आला असून नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून या गंभीर प्रकाराची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.वाशिम रेल्वे स्थानकावरून अकोला, नागपूर, हैद्राबाद, काचीगुडा, पुर्णा, नांदेड, परळी, नरखेड आदिठिकाणी अनेक पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या धावतात. त्यामुळे दिवसभर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, दोनच तिकीट काऊंटर कार्यान्वित राहत असल्याने होणाºया गर्दीचा फायदा घेत रेल्वे विभागाचे काही कर्मचारी स्थानक परिसरात उभे राहून जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून देत असल्याची माहिती मिळाल्यावरून ‘लोकमत’ने या गंभीर प्रकाराची शहानिशा करण्यासाठी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता, प्रवाशांनी फेकून दिलेली तिकीटे पुन्हा वापरात आणून त्यावर पेनाने आजचा प्रवास लिहून देणारे काही कर्मचारी आढळून आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने १४ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची रेल्वे विभागाने तडकाफडकी दखल घेवून सुरू असलेला प्रकार तत्काळ बंद केला. तसेच नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून या गंभीर प्रकाराची चौकशी देखील सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम रेल्वे स्थानकावर घडत असलेला जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून देण्याचा प्रकार निश्चितपणे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी कर्मचाºयांची गय केली जाणार नाही.- राजेश शिंदेजनसंपर्क अधिकारी, दक्षिण मध्य रेल्वे विभाग, नांदेड