शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या आॅनलाईन नोंदणीत वाशिम आठव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 3:50 PM

वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर आॅनलाईन नोंदी घेतल्या जात आहेत.

वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर आॅनलाईन नोंदी घेतल्या जात आहेत. नोव्हेंबर महिन्याअखेर १ डिसेंबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार आॅनलाईन नोंदणीत पश्चिम वºहाडातील बुलढाणा जिल्हा चवथ्या क्रमांकावर, वाशिम आठव्या तर अकोला जिल्हा २६ व्या क्रमांकावर आहे.जागेअभावी लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहू नये म्हणून निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यात आल्या आहेत. ही मोहिम राज्यभरात राबविली जात आहे. वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, १९ हजार ८० नोंदी घेण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायती असून, ३४ हजार ३५ तर अकोला जिल्ह्यात ५३३ ग्रामपंचायती असून, केवळ ३६६८ नोंदी घेण्यात आल्या आहेत. अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी घेतलेल्या या नोंदी प्रमाणित झाल्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जाते. त्यानंतर संबंधित पात्र लाभार्थीला घरकुलाचा लाभ दिला जातो. पश्चिम वºहाडातील वाशिम, बुलडाणा व अकोला जिल्ह्यात आॅनलाईन नोंदी घेण्यात आल्या असून, त्यापुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. राज्यातील आकडेवारीचा विचार करता बुलडाणा व वाशिम जिल्ह्याची कामगिरी सरस असून, त्या तुलनेत अकोला जिल्ह्याची कामकाजाची गती मंदावली असल्याचे दिसून येते. 

ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर आॅनलाईन नोंदी घेण्यात आल्या. या नोंदीत नोव्हेंबर महिन्याअखेर वाशिम जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो. कामकाजाला आणखी गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.-नितीन पाटील मानेउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमbuldhanaबुलडाणाAkolaअकोला