वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कर्मचारी निवासस्थानांकरिता उभारण्यात आलेल्या तीन इमारती वापराविनाच जुन्या झाल्या होत्या. साधारणत: अडीच वर्षे तशाच स्थितीत असलेल्या या इमारतींच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतींच्या डागडूजीची कामे सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांकरिता हक्काच्या निवासस्थानांची सोय व्हावी, याकरिता लाखो रुपये खर्चून अडीच वर्षांपूर्वी तीन भव्यदिव्य इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. काम पुर्णत्वानंतर रितसर बांधकाम विभागाने नव्याकोºया तथा सुस्थितीमधील इमारती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे हस्तांतरित केल्या. मात्र, इमारतींचा वापरच न झाल्याने मूळ उद्देश असफल होण्यासोबतच मुख्य प्रवेशव्दाराला गेट नसल्याने तीनही इमारतींच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात घाण साचली होती, खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. इमारतींकडे जाण्याकरिता तयार करण्यात आलेला ‘पेवर ब्लॉक’चा रस्ताही खराब झाला होता. यासह इमारतीमधील इलेक्ट्रिक फिटींग पुर्णत: तोडून त्याचा केबल, स्विच यासह इतर साहित्य कुणीतरी चोरून नेले होते. एकूणच या सर्व बाबींमुळे तीनही इमारती तब्बल अडीच वर्षे याच स्थितीत विनावापर पडून होत्या. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून कोट्यवधी रुपयांच्या या इमारतींची डागडूजी झाल्यास तसेच सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा वापर होऊ शकतो, ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, हा विषय आता मार्गी लागला असून तीनपैकी दोन इमारतींची स्वच्छता, रंगरंगोटी, इलेक्ट्रिक फिटींग, नळ फिटींग यासह इतर कामे सुरू असून संरक्षण भिंतीवर तार फेन्सींग आणि मुख्य प्रवेशव्दाराला गेट बसवून त्यावर वॉचमॅनची व्यवस्था करून दिली जात आहे. ही कामे लवकरात लवकर आटोपून पुन्हा एकवेळ चांगल्या स्थितीतील इमारती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे हस्तांतरित केल्या जातील, अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.ए.चेके यांनी दिली.
वाशिम : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे पालटतेय रुपडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 3:03 PM
वाशिम : इमारतींच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतींच्या डागडूजीची कामे सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्दे इमारतींचा वापरच न झाल्याने मूळ उद्देश असफल होण्यासोबतच मुख्य प्रवेशव्दाराला गेट नसल्याने तीनही इमारतींच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. इमारतींकडे जाण्याकरिता तयार करण्यात आलेला ‘पेवर ब्लॉक’चा रस्ताही खराब झाला होता. इमारतीमधील इलेक्ट्रिक फिटींग पुर्णत: तोडून त्याचा केबल, स्विच यासह इतर साहित्य कुणीतरी चोरून नेले होते.